Thoughts in 2023 Aug

by | Aug 3, 2023 | General

Some of the thoughts of mine relating to this ChronoMapia project. Reproducing them here.

मागील अनेक दिवसापासून ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, Astronomy, काही अंशी Astrology तसेच भारतीय दर्शनशास्त्रे, भारतीय गणित, तर्क, न्याय इ. विषयांवर वाचन व विचार मंथन सुरू आहे. खरं तर अगदी लहानपणापासून मला अशा गुढ विषयांबद्दल खूपंच आकर्षण आहे. ‘गुढ’ कारण या विषयांना अधिकृत शैक्षणिक क्षेत्रात प्राधान्य, मान्यता तर नाहीच पण साधा उल्लेखही नसतो. आजपासून मागे, केवळ ४ ते ५ सहस्र वर्षांपूर्वीच आधुनिक मानवाचा इतिहास संपतो अशी मान्यता आहे. त्यामुळे, भारतीय परंपरेतील सहस्रावधी वर्षांपूर्वीच्या उपलब्ध इतिहासाचा अभ्यास व्हायला हवा. अशातंच गुरुकृपेमुळे, वेळोवेळी त्या त्या विषयाची ओळख करुन देणारे साहित्य समोर येत आहे. सतत होणाऱ्या गोष्टीला योगायोग म्हणणे यापेक्षा गुरुकृपा म्हणणे मला अधिक योग्य वाटते.

भारतीय कालमापन, इतिहासातील संदर्भ इ. मधून आपल्याला प्राचीन भारतीय लोकांची वैज्ञानिक जाण किती प्रखर असेल याची प्रचिती येते. आणि त्यामुळे, त्यांनी मांडलेल्या संकल्पना किंवा घटना अधिक वैज्ञानिक व तथ्यपूर्ण वाटतात.

उदा. आकाश निळे दिसते पण प्रत्यक्ष काही निळे नसते. असा सापेक्षतेचा दृष्टिकोन पाश्चिमात्य विश्वातील ‘आधुनिक’ मानवाला अलिकडेच समजायला लागला आहे. पण या आणि अशा अनेक बाबींबद्दल शेकडो वर्षांपूर्वीच संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगांमधे अनेक ठिकाणी बोलतात. (अमृतानुभव- ६-३६) (https://www.youtube.com/live/9omlY-oLHZA?si=7jZVtWrMA8Gc_kxb&t=1622). आद्य शंकराचार्यही असे अनेक दृष्टांत देतात. भारतीय विज्ञान / शास्त्रे पाश्चात्यांपेक्षा अनेक बाबतीत प्रगल्भ व खऱ्या अर्थाने आधुनिक आहेत हे थोडा अभ्यास केल्यावर लगेच जाणवायला लागते.

त्यामुळे, खगोल इ. शास्त्रे किमान तोंड ओळख का होइना पण वैज्ञानिक दृष्ट्या समजुन, पडताळून घेण्याची तहान लागू लागली. त्याखातर मी शोधाशोध सुरू केली होती. अशातंच महर्षी प. वि. वर्तक यांचे ग्रंथ व त्यानंतर निलेश ओक यांचे YouTube वरील अनेक video / blog समोर येउ लागले. महर्षी प.वि. वर्तक यांचं रामायण, महाभारताच्या काल निर्धारणावरील व उपनिषदांवरील विवेचन खूपंच अदभूत वाटलं. निलेश ओक यांची कालनिर्णय करण्यासाठी ज्योतिषाचा वापर करण्याची पद्धत खूपंच वैज्ञानिक आहे.

वैज्ञानिक पद्धत म्हटल्यावर आपण किमान काही प्रयोग करुन / पडताळूनंच त्यावर विश्वास ठेवायला हवा. माझं कार्यक्षेत्र technical 3D visualisation असल्यामुळे मी हे खगोलातील उल्लेख प्रत्यक्ष simulation करून पडताळायचं ठरवलं. तसं केल्यावर मला आढळलं की अगदी साध्या demonstrational simulation model वरुनही त्यांची सत्यता सिद्ध होत आहे. निलेश ओक यांचे YouTube वरील व्हिडिओ बघत असताना मला एक गोष्ट प्रकर्शाने जाणवली. ती म्हणजे त्यांच्या दर्शकांपैकी अनेक जणांना इतिहासातील खगोलीय वर्णने समजून घ्यायला काहीसा त्रास होत आहे. आणि वेळे अभावी, निलेश ओक काय किंवा कोणालाही, या खगोलीय संकल्पना अगदी सुरुवाती पासून पुन्हा पुन्हा समजावणे शक्य नाही.

या कारणातूनंच, माझ्या 3d visualisation क्षेत्रातील अनुभवाचा वापर करून हे विषय समजावून सांगवे असं वाटू लागलं. पुढे वेळ मिळेल तसा व शक्य होइल तितका प्रयत्न मी करणार आहे. बघू हा concept पुढे कसं रुप घेतो ते? यासाठी गणपती बाप्पा बळ देवो अशी प्रार्थना!

महेश देशपांडे

रविवार ०३ ऑगस्ट २०२३, संकष्टी चतुर्थी (कृ. प.) नीज श्रावण, पुणे.