09 The motions of Moon

by | Oct 27, 2024 | Astronomy101

Astronomy 101

चंद्र गति

पाहू आता चंद्राचीही गति ।
फिरतो पृथ्वीच्या सभोवती ।

अत्यंत असे उपयुक्त ती ।
मापण्या काल ।। ५७ ।।

कालमापनाच्या पद्धतींचा विचार केला तर, भारतीय लोक अगदी प्राचीन काळापासून खूप प्रयोगशील व प्रगत असल्याचं दिसतं. कालमापनासाठी एकाच वेळी सूर्य, चंद्र, इतर ग्रह आणि मागील तारका व नक्षत्रांचा वापर भारतीय सोडून इतर कोणीही इतक्या सुंदर रितीने केलेला दिसत नाही. पाश्चिमात्य पद्धत ही प्रामुख्याने सूर्याच्या स्थितीवर आधारीत आहे तर अरब देशांची पद्धत प्रामुख्याने चंद्राच्या स्थितीवरून ठरते. भारतीय इतिहासात ठिकठिकाणी चंद्र, सूर्य, इतर ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितींचा परस्पर-सापेक्ष उल्लेख केलेला दिसतो. यावरून त्यांचं प्रचंड खगोलज्ञान तर सिद्ध होतंच पण तो काळ नक्की कोणता असेल हे शोधायलाही उपयोग होतो. त्यांचा वापर करूनंच तर श्री. निलेश ओक या प्राच्य संशोधकांनी रामायणाचा काळ आजपासून १४,००० वर्षांपूर्वीचा आणि महाभारताचा काळ ७,००० वर्षांपूर्वीचा असल्याचं सिद्ध केलंय.

चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे आपल्याला माहितंच आहे. आधुनिक भाषेप्रमाणे चंद्र हा पृथ्वीचा ‘उपग्रह’ आहे. सूर्य व चंद्र हे दोन्ही प्लॅनेट नाहीत, मात्र ज्योतिषाच्या भाषेनूसार ते ‘ग्रह’ नक्किच आहेत. कारण मुळात प्लॅनेट आणि ग्रह हे दोन समानार्थी शब्द नाहीतंच. पृथ्वीसापेक्ष विचार केला तर, चंद्र हा सूर्य व इतर ग्रहांप्रमाणेच आकाशात फिरताना दिसतो, मात्र मागील नक्षत्रे स्थिर जाणवतात. ते सतत वेगवेगळी स्थानं ‘ग्रहण’ करतात, म्हणून त्यांना ग्रह म्हणतात. हे आपण मागे बघितलंच. चंद्राच्या विशिष्ट गतीमूळे त्याचा भारतीय कालमापन पद्धतीत प्रकर्षाने उपयोग केला जातो. आता आपण चंद्राच्या कालमापनास महत्वाच्या गति आणि स्थिती बद्दल बोलू.

चंद्राचे आणि सूर्याचे स्थान ।
पृथ्वीहून केल्या निरीक्षण ।

सापेक्ष स्थिती हेच कारण ।
चंद्र कलांचे ।। ५८ ।।

चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग आणि सूर्याचा पृथ्वीभोवती भासमान फिरण्याचा वेग यात फरक आहे. दर दिवशी ठराविक वेळेला आपण चंद्राचं निरीक्षण केलं तर सूर्य व चंद्र यांचं परस्पर सापेक्ष स्थान बदललेलं दिसतं. त्यामुळे दर दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वीतील कोन बदलंत रहातो. चंद्राचा सूर्यामुळे प्रकाशित होणारा भागही त्यामुळे बदलताना दिसतो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो.

सूर्य आणि चंद्र आकाशात ।
दोन्ही वसती एका दिशेत ।

स्थिती अशी होता म्हणतात ।
अमावस्या ही  ।। ५९ ।।

आकाशात दिसणाऱ्या नैसर्गिक वस्तूंमधे धूमकेतू, उल्का वगळता सर्वात वेगाने पुढे जाणारी वस्तू म्हणजे चंद्र. चंद्राचं दर दिवशी निरीक्षण केलं तर असं दिसतं की तो आदल्या दिवसापेक्षा जास्त पुढे सरकलेला आहे. असं पुढे सरकत जात एक वेळ अशी येते की त्या दिवशी चंद्र व सूर्य आकाशात एकाच भागात येतात. याला अमावस्या म्हणतात. संस्कृतमधील ‘अमावस्या’ या शब्दाचा अर्थंच मुळी अमा-एकत्र असणे असा आहे. ज्यावेळी चंद्र व सूर्य आकाशात ‘अम’ म्हणजे एकत्र वसतात ती अमावस्या.

भाग चंद्राचा होई अंधारा ।
तोच पृथ्वीस असे सामोरा ।

नसे नभी चंद्र दिसणारा ।
अमावस्येस ।। ६० ।।

पृथ्वीवरून निरीक्षण करताना अमावस्येला चंद्र सूर्याच्या जवळंच असतो किंबहूना सूर्य चंद्राच्या मागील बाजूस असतो. चंद्राचा सूर्यप्रकाशात असणारा भाग पृथ्वीच्या दृष्टीने पलिकडे असतो. उलट चंद्राचा अंधारात असलेला भाग पृथ्वीच्या बाजूला असतो. दिवसा सूर्याचं प्रचंड तेज आणि त्यात चंद्राचा अंधारा भाग आपल्याकडे असल्यामुळे चंद्र दिसू शकत नाही. आणि रात्री चंद्र व सूर्य दोघेही क्षितिजा-पलिकडे असतात, त्यामुळे चंद्र दिसण्याचा प्रश्नंच येत नाही. त्यामुळे अमावस्येला चंद्राचा अजिबात पत्ता लागत नाही. रात्री आकाशात सूर्य व चंद्र हे दोघेही नसल्यामुळे, अमावस्येला इतर ग्रह व तारे मात्र खूपंच स्पष्ट दिसतात. दैनंदिन निरीक्षणाच्या आधारावरून गणित करून चंद्राचं स्थान सांगता येतं. 


प्रतिदिन चंद्र जाइ पुढे ।
कलेकलेने तसा तो वाढे ।

कालास याच नाव हे पडे ।
शुक्ल पक्षाचे ।। ६१ ।।

अमावस्येची सूर्य व चंद्र एकाच जागी असण्याची स्थिती फार काळ काही टिकत नाही. दुसऱ्या दिवशी चंद्र सूर्याच्या मानाने पुढे सरकलेला असतो. पुढील दर दिवशी तो सरकत गेल्यामुळे हळूहळू त्याचा प्रकाशातील भाग आपल्याला दिसू लागतो. आपण त्याला ‘चंद्राची कोर’ किंवा ‘चंद्रची कला’ म्हणतो. दर दिवशी चंद्रकला वाढत-वाढत जाताना दिसते. या काळाला ‘शुक्ल पक्ष’ म्हणतात. शुक्ल म्हणजे पांढरा.

दिनक्रमे चंद्र सरकत ।
येतो जागी सूर्या विपरीत ।

पृथ्वी असे दोघांमधे स्थित ।
पोर्णिमेस ही ।। ६२ ।।

अमावस्येनंतर दर दिवशी चंद्र अधिकाधीक प्रकाशमान होताना दिसतो. असं अंदाजे १४ ते १५ दिवस होत रहातं. चंद्र सरकत सरकत आता सूर्याच्या पुर्णपणे विरूद्ध बाजूस आलेला असतो. पृथ्वीवरून बघताना सूर्य व चंद्र बरोबर विरुद्ध दिशेस असतात. पृथ्वी दोघांच्या मधे असते. त्यामुळे चंद्राचा प्रकाशीत भाग पृथ्वीवरून पुर्णपणे दिसतो. या काळाला पोर्णिमा म्हणतात. पोर्णिमेला चंद्र पुर्ण व प्रखर दिसतो. इथे शुक्ल-पक्ष संपतो.

असा पुढे पोर्णिमे पासून ।
अमावस्येस येतो फिरून ।

पुन्हा जातो चंद्र अंधारून ।
कृष्ण पक्षात ।। ६३ ।।

पोर्णिमेच्या नंतर पुन्हा चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून पाहता पलिकडे सरकत जातो. दर दिवशी चंद्रकोर लहान-लहान होत जाते. या काळाला ‘कृष्ण पक्ष’ म्हणतात. चंद्र सरकत सरकत पुन्हा सूर्याच्या भागात येतो. अंदाजे १४-१५ दिवसांनी तो सुर्याजवळ पोहोचतो आणि पुन्हा अमावस्या स्थिती येते.

चंद्राचे असे एक भ्रमण ।
पृथ्वीभोवती परिक्रमण ।

नाव चांद्रमास असे जाण ।
याच काळाचे ।। ६४ ।।

अमावस्येपासून सरकत पोर्णिमेपर्यंत व पुन्हा अमावस्येपर्यंत असं चंद्राचं एक चक्र म्हणजे एक चांद्रमास. हा काळ सूर्याच्या महिन्यापेक्षा कमी असतो. चांद्रमास साधारण २८-२९ दिवसांचा असतो. चांद्रमासाचा सूर्यमासाशी किंवा दिवसांशी तसा काही थेट संबंध नाही. भारतीय कालगणनेत चांद्रमास व अशा १२ चांद्रमासांच एक वर्ष असं प्रमुख्याने वापरलं जातं. मात्र प्रांतवार इतरही अनेक पद्धती आहेत. भारतात सतत बदलणाऱ्या गोष्टींसाठी प्रादेशिकतेला जास्त प्राधान्य दिलेलं दिसतं तर अध्यात्म इत्यादी न बदलणाऱ्या बाबांमधे सर्वसमावेशक, स्थिर वर्णनं आढळतात.

चांद्रमास दोन प्रकारचे असतात. एका प्रकारात अमावस्येपासून अमावस्येपर्यंत चांद्रमास धरतात. आपल्याकडे महाराष्ट्रात व इतरही अनेक भागात हाच चांद्रमास वापरतात. याला ‘अमांत’ म्हणतात, म्हणजे अमावस्येला मास संपून पुढचा मास सुरू करणे. कालमापनात अमावस्येचा सर्वात मोठा उपयोग असा की या वेळेला रात्री चंद्र नसल्यामुळे इतर ग्रह व नक्षत्रं खूपच स्पष्टपणे दिसतात व त्यांच्या नोंदी करणं सोपं होतं. याशिवाय भारतात अनेक ठिकाणी ‘पोर्णिमांत’ पद्धतही वापरली जाते. यात नावाप्रमाणेच, पोर्णिमेला आधिचा मास संपून नवीन सुरू होतो. चंद्राच्या कला, तिथी इत्यादी अनेक गोष्टी कालमापनात उपयुक्त ठरतात. त्याबद्दल पुढे गरजेनूसार बोलूच.

Astronomy 101

The motions of moon

पाहू आता चंद्राचीही गति ।
फिरतो पृथ्वीच्या सभोवती ।

अत्यंत असे उपयुक्त ती ।
मापण्या काल ।। ५७ ।।

If we consider the methods of measuring time, the people of Bharat were very progressive and advanced, even thousands of years ago. Besides Bharat, no one seems to have used the Sun, moon, planets, and stars to keep track of time in such an extraordinary way. The Western method is based on the Sun’s position, and the Arabic method is mainly moon-based. In the Itihas text, we find plenty of references about the relative positions of the Moon, Sun, planets, constellations, etc. It not only proves their vast knowledge of astronomy but also helps us to determine the historical timeline. The Bharatiya Itihas researcher Shri Nilesh Oak used these records to prove the timing of the Ramayan as 14,000 years ago and of the Mahabharat as 7,000 years ago.

We know that the moon orbits around the Earth. In modern Western language, the moon is a natural ‘satellite’ of the Earth. The Sun and the Moon are NOT planets, but in Jyotish language, they ARE ‘Grahas’. The words- ‘Graha’ and ‘Planet’ don’t mean the same thing. Relative to Earth, the moon also moves around like the Sun and planets in the sky. In contrast, the Nakshatras remain stationary. To take means grahaNa (ग्रहण). The Grahas take different positions daily; hence, they are called Grahas. We have seen this earlier. The Bharatiya timekeeping practices use the moon’s particular motions very effectively. We will now see some of the noteworthy motions of the moon.

चंद्राचे आणि सूर्याचे स्थान ।
पृथ्वीहून केल्या निरीक्षण ।

सापेक्ष स्थिती हेच कारण ।
चंद्र कलांचे ।। ५८ ।।

The moon’s orbiting speed and the Sun’s apparent speed around Earth differ. If we observe the moon daily, its position relative to the Sun shifts, causing a change in the angle between the Earth, moon and Sun. The lit-up side of the moon also shifts seen from Earth. We call it the phases of the moon.

सूर्य आणि चंद्र आकाशात ।
दोन्ही वसती एका दिशेत ।

स्थिती अशी होता म्हणतात ।
अमावस्या ही  ।। ५९ ।।

The moon is the fastest-moving natural object observable regularly in the sky after comets and meteors. Every day, it shifts ahead of the previous day. Thus, moving daily, it eventually reaches near the Sun’s direction, and we see the Sun and the moon together in the sky. This phase is called the Amavasya or the ‘New Moon’. The Sanskrit word Amavasya means ‘staying together’. When the moon and the Sun are together, it is called the Amavasya or the New Moon.

भाग चंद्राचा होई अंधारा ।
तोच पृथ्वीस असे सामोरा ।

नसे नभी चंद्र दिसणारा ।
अमावस्येस ।। ६० ।।

When seen from the Earth on Amavasya, the moon is in the same proximity as the Sun; in fact, the Sun is behind the moon. The moon’s surface, lit up by sunlight, is on the opposite side of Earth. On the other hand, the moon’s surface in the shade faces the Earth. During the day, even if the moon is near the Sun, we can not see it. The first reason is the Sun’s extreme brightness and also because of the moon’s shaded side facing us. At night, seeing it is out of the question since the moon is along with the Sun on the opposite side of the horizon. That is why we can not trace the moon on New Moon Day. Since the moon and the Sun are absent in the sky on the night of the New Moon, the planets and stars appear very clear. We can still locate the moon’s exact position by estimating from earlier observations.


प्रतिदिन चंद्र जाइ पुढे ।
कलेकलेने तसा तो वाढे ।

कालास याच नाव हे पडे ।
शुक्ल पक्षाचे ।। ६१ ।।

The phase of Amavasya, when the Sun and moon are together, remains short. Soon, the moon shifts ahead of the Sun. Every day, when it shifts ahead, its surface, lit by Sunlight, gets revealed more and more. We call it the Waxing phases of the moon, or ‘Shukla-Paksha’ (शुक्ल पक्ष). Shukla means white or bright.

दिनक्रमे चंद्र सरकत ।
येतो जागी सूर्या विपरीत ।

पृथ्वी असे दोघांमधे स्थित ।
पोर्णिमेस ही ।। ६२ ।।

The moon gets more and more lit-up everyday after New Moon Day. This keeps happening for the next 14 to 15 days. The moon moving ahead of the Sun reaches the side exactly opposite to the Son. Seen from Earth, the Sun and moon are opposite to each other. Earth is in between both. The lit-up side of the moon faces the Earth; hence, the entire moon disk is visible. This phase is called the ‘Full Moon’ or ‘PorNima’ (पौर्णिमा). Here, the waxing phase of the moon ends.

असा पुढे पोर्णिमे पासून ।
अमावस्येस येतो फिरून ।

पुन्हा जातो चंद्र अंधारून ।
कृष्ण पक्षात ।। ६३ ।।

After the Full moon or Pornima, the bright area of the moon again decreases daily. We call it the waning phase or ‘Krishna Paksha’ (कृष्ण पक्ष). The moon again comes towards the Sun. After around 14-15 days, it reaches the same direction as the Sun, the New Moon phase.

चंद्राचे असे एक भ्रमण ।
पृथ्वीभोवती परिक्रमण ।

नाव चांद्रमास असे जाण ।
याच काळाचे ।। ६४ ।।

Thus, one cycle of the moon, from the new moon to the full moon and back to the new moon, is called the lunar month or the ‘Chaandra-maas’ (चांद्र मास). The Chaandra-maas is about 28 to 29 days, which is smaller than the Solar month. There is no direct correlation between the Chaandra-maas and the Solar month or the Solar days. The Chaandra-maas and the year having 12 such Chaandra-maas are widely used in Bharatiya timekeeping practices. However, variations in counting months and years are present throughout various locations. In India, it seems that localised methods are implemented for ‘frequently changing phenomena’, and generalisation is done for stable topics like spirituality and philosophy, etc.

The lunar months, or the Chaandra-maas, are of two types. One is to count from the New moon to the next new moon. It is called the ‘Amaanta’ (अमांत) Chaandra-maas. The Amaanta type is used in Maharashtra and many other regions of Bharat. Amaant means the current month ends on Amavasya, and the following month begins. The Amaavasya, or the New Moon, is crucial for timekeeping, as the sky is clear at night due to the lack of Sun and moon. We can easily see the planets, stars, and constellations and record their positions and states. The other method, called the ‘Pournimanta’ (पौर्णिमांत), is to count months from the Full moon. The phases of the moon and its use to count days, months, and years, along with the solar cycle, are unique to the Bharatiya method. We will talk about that in future as needed.