08-Earths Revolution part 2

by | Oct 19, 2024 | Astronomy101

Astronomy 101

पृथ्वीचं सूर्याभोवती परिभ्रमण भाग २

सुर्य उत्तर दिशेस चळे ।

फिरून दक्षिणेस तो वळे ।

अयन नाम गतिस मिळे ।

वर्षात दोन ।। ४९ ।।

सूर्याच्या उदयाचं स्थान वर्षभरात दर दिवशी पूर्वेपासून सरकताना जाणवतं. वर्षातील सहा महिने ते उत्तेरेकडे सरकत जातं व उरलेले सहा महिने ते दक्षिणेकडे सरकतं. सूर्याच्या सरकण्याच्या या दोन भासमान गतींना अयन गति म्हणतात. आता असं समजा की सूर्य जेवढा दक्षिणेस जाउ शकतो तेवढा पूर्ण सरकलेला आहे. या बिंदूपासून आणि या वेळेपासून आपण मोजायला सुरवात केली. तिथून एक अयन सुरू होतं. सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो. सरकत सरकत तो एके ठिकाणी येतो व त्याची उत्तरेकडची गति थांबते. इथपर्यंत एक अयन. या ‘थांबण्याला’ इंग्रजीत ‘Solstice’ म्हणतात. (Sol = सूर्य, stice = स्थित, थांबलेला). मग तो उलट पून्हा दक्षिणेकडे सरकायला लागतो. हे दूसरं अयन. जेंव्हा तो दक्षिणेकडच्या बिंदूपाशी येतो तेंव्हा एक वर्ष पूर्ण झालेलं असतं. अशाप्रकारे तो एका वर्षात एकदा उत्तरेकडे आणि एकदा दक्षिणेकडे अशा दोन अयनातून जातो.

दक्षिणेहून नभी हलत ।

पुढे उत्तरेस सरकत ।

गतिस रवीच्या म्हणतात ।

उत्तरायण ।। ५० ।।

यातील एक अयन म्हणजे उत्तरायण (उत्तर + अयन = उत्तरायण, यात उत्तर मधल्या ‘र’ मुळे अयनचं रूप ‘अयण’ असं होतं). सूर्य दक्षिणेच्या बिंदूपासून उत्तरेला सरकत जातो म्हणून हे उत्तरायण किंवा उत्तरेकडे सरकणे. भारत हा उत्तर गोलार्धात आहे त्यामुळे आपण उत्तर गोलार्धाच्या अनुषंगानेच बोलत आहोत. दक्षिण दोलार्धात याच्या बरोबर उलट स्थिती असते.

उत्तरायणाच्या सुरवातीला सूर्य दक्षिणेस असतो. याला इंग्रजीत ‘Winter Solstice’ म्हणतात. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर झूकलेला असतो. हा साधारण २१ किंवा २२ डिसेंबर चा काळ असतो, दिवस लहान व रात्र मोठी असते. इथून उत्तरायण सूरू होतं. सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकायला लागतो. साधारण तीन महिन्यानंतर उत्तरायणाचा मध्य येतो. सूर्य बरोबर पूर्व दिशेस उगवताना दिसतो. २० मार्च च्या सूमारास दिवस व रात्र समान वेळेच्या असतात. उत्तरायण आणखी तीन महिने चालू रहातं. सूर्य तसाच उत्तरेकडे सरकत जातो. साधारण २० / २१ जून च्या सुमारास तो पूर्वेपासून बराच उत्तरेस दिसतो, त्यापेक्षा पुढे आणखी जात नाही. इथे उत्तरायण पूर्ण होतं.

तिथून पुन्हा मागे फिरून ।

होतो दक्षिणेस गतिमान ।

जाणा यासच दक्षिणायन ।

सूर्याचे असे ।। ५१ ।।

२० ते २१ जून ला सूर्य जास्तीत जास्त उत्तरेस असतो. या बिंदूला इंग्रजीत ‘Summer Solstice’ म्हणतात. उत्तरेकडील गति थांबलेली असते. उत्तर गोलार्धात दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. मग दर दिवशी सूर्य दक्षिणेकडे सरकायला लागतो. ही दक्षिणेकडील गती म्हणजेच दक्षिणायन (दक्षिण + अयन = दक्षिणायन). याच्या मध्यास म्हणजे २२/२३ सप्टेंबर ला पून्हा दिवस व रात्र समान लांबीच्या असतात. दक्षिणायन पुढे आणखी तीन महिने सुरू रहातं. २१ / २२ डिसेंबर ला सूर्य जास्तीतजास्त दक्षिणेस असतो. तिथून तो आणखी दक्षिणेकडे जात नाही. इथपर्यंत म्हणजे सहा महिन्यापर्यंत दक्षिणायन चालतं.

उत्तर आणि दक्षिणायन ।

एकेक अशी ही आवर्तनं ।

करतो प्रत्येक वर्षातून ।

सूर्य आपूला ।। ५२ ।।

अशा प्रकारे २१/२२ डिसेंबर पासून २०/२१ जून पर्यंतचे सहा महिने उत्तरायण आणि पून्हा २१/२२ डिसेंबर पर्यंतचे सहा महिने दक्षिणायन असतं. म्हणजे एका वर्षात एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन होतं. हे सतत सुरू असतं. इथे इंग्रजी दिनांक देण्याचं कारण असं की इंग्रजी कॅलेंडर हे सूर्यावरंच आधारीत आहे आणि त्यातील दिनांक हे याच summer आणि winter solstice नुसार ठरवले जातात, त्यामुळे ते कायम याच दिनांकास येतात. त्यामुळे बहुतांश वेळा हे दिनांक बरोबर येतात. अनेक वर्षात यातही थोडा बदल होत जातो व कालांतराने कॅलेंडरही पून्हा ‘calibrate’ करावी लागतात, त्यात सुधारणा कराव्या लागतात. भारतीय कालमापनातही प्राचिन काळापासून कालगणनेत असे सूधार केल्याचं दिसतं. किंबहूना हे सुधार केल्याचं लक्षात येताच त्यांचा खरा काळ शोधायला मदत होते. अन्यथा ते दिनांक चुकीचे किंवा कवीकल्पना वाटू शकतात.

गतीने सूर्याच्या या वार्षिक ।

असे एका मागूनीया एक ।

फिरते सहा ऋतुंचे चाक ।

गोल सतत ।। ५३ ।।

सूर्याची ही अयन गति वार्षिक असते. दर वर्षी सूर्य असं अयन करतो. सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष स्थानामूळे पृथ्वीवरील वातावरणात सतत बदल होत असतात. उन्हाळा, पावसाळा इ. सर्व सहा ऋतू सूर्यावर व या अयनगतीवरंच अवलंबून असतात. जसजसं सूर्य अयनातून पुढे सरकतो तसतसे ऋतूही पुढे सरकत जातात. ऋतूचं चक्र सूर्याबरोबर गोल फिरून पुन्हा सूरू होतं. अर्थात ठिकठिकाणच्या भौगोलिक, चंद्राचा प्रभाव व इतर परिस्थितींमुळे सर्वत्र ऋतू काही समान प्रमाणात जाणवत नाहीत. भारतातील साधारण सर्व भागात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू प्रमुख्याने जाणवतात. आपण जसजसं उत्तर व दक्षिण दिशेस जातो तसतसं तेथील ऋतूचक्रात बदल होताना जाणवतो. विषूववृत्त पार केल्यावर अयन व त्यामुळे ऋतू हे उलट असतात.

वसंत ग्रीष्म वर्षा नंतर ।

शरद हेमंत व शिशिर ।

चक्र हे फिरे धरणीवर ।

ऋतूंचे सहा ।। ५४ ।।

भारतीय कालमापन पद्धतित सहा ऋतू मोजण्याची पद्धत आहे. वसंत ऋतूत सर्वत्र नवचैतन्य पसरतं. नुकतीच कडाक्याची थंडी पडून गेलेली असते व हळूहळू उबदार वातावरण येत असतं. सध्या चैत्र महिना हा वसंत ऋतूतंच येतो त्यामुळे आपण त्याला मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ मानतो. भगवत गीतेत भगवान कृष्ण अर्जूनाला सांगताना म्हणतात – “मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः” ।।१०.३५ ।। ते म्हणतात की “सर्व मासांमधे मी (भगवान कृष्ण) म्हणजे मार्गशीर्ष आणि सर्व ऋतूंमधे मी वसंत आहे”. प्रचलित मान्यतेप्रमाणे महाभारत साधारण मागील २००० ते ३००० वर्षांत घडलेलं असावं पण या कालखंडात वसंत आणि मार्गशीर्ष हे दोन्ही वेगवेगळ्या वेळी येतात. कदाचित याच मुळे, गीतेच्या सध्या उपलब्ध भाषंतरामधे जवळपास सर्वंच भाषांतरकारांनी यो दोन गोष्टींची म्हणजे मास आणि ऋतूंची सांगड घालणं टाळलेलं दिसतं.

मात्र श्री निलेश ओक यांच्या संशोधनानंतर, महाभारताचा काळ इ.स.पूर्व ५५६१ हा नक्की कळल्यामुळे, महाभारत काळी मार्गशीर्ष व वसंत ऋतू हे एकाच वेळी येत होते हे सहज लक्षात येतं. मार्गशीर्ष हा त्या वेळेचा प्रारंभ महिना असावा. त्यामुळेच कदाचित श्रीकृष्णानी स्वत: ची उपमा सर्वोत्तम काळाबरोबर केली आहे हे सयुक्तिक वाटतं. असो, हे कसं होतं ते आपण पुढे हे बघणारंच आहोत.

वसंत नंतर क्रमाने ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ऋतू येतात. सर्व मिळून पुर्ण वर्षात हे सहा ऋतू होतात.

करतो सूर्य अर्ध वर्षात ।

पृथ्वीच्या एका अर्धगोलात ।

प्रखरत असा उष्मापात ।

ग्रीष्म कारक ।। ५५ ।।

दक्षिणायनाच्या आरंभी म्हणजे मे, जून च्या सूमारास, सूर्य उत्तरेस सरकलेला दिसतो. दिवस मोठा आणि रात्र कमी वेळेची असते. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झूकलेला असतो, त्यामूळे दिवसाचे अनेक तास जमिनीवर सूर्यप्रकाश पडत राहतो. या भागात ग्रीष्म ऋतू जाणवतो, सर्वत्र उकाडा पसरतो.

एकीकडे सूर्य प्रखरत ।

पलिकडे अभावाने शीत ।

गति फिरवे चक्र सतत ।

सहा ऋतूंचे ।। ५६ ।।

या काळात उत्तर गोलार्धात सूर्याच्या उष्णतेमुळे प्रचंड उन्हाळा अनुभवास येतो तर त्याच वेळी उलट दक्षिण गोलार्धात या सूमारास रात्र मोठी असते. सूर्यप्रकाश खूप कमी वेळ पडतो त्यामुळे तिथे थंडी सुरू होत असते. असं दोन्ही गोलार्धात बरोबर उलट चित्र असतं. एकिकडे वसंत असेत तर दुसरीकडे शरद. एकीकडे ग्रीष्म तर दुसरीकडे शिशिर, अशी स्थिती असते. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि तिच्या विशिष्ट कोनामुळे दोन्ही गोलार्धात हे असं चक्र सतत चालू असतं.

Astronomy 101

Earth’s rovolution around the Sun – Part 2

सुर्य उत्तर दिशेस चळे ।

फिरून दक्षिणेस तो वळे ।

अयन नाम गतिस मिळे ।

वर्षात दोन ।। ४९ ।।

Throughout the year, the position of the sunrise shifts from the east. For six months, it moves towards the north; for the rest, it moves to the south. In Indian astronomy, the two apparent shifting motions of the Sun are called ‘अयन गति’, Ayana motions. Imagine the Sun is as far south as it can get. This point is called the Solstice. This is the beginning of the ‘Ayana’ motion. If we start observing the position and time from this point, we will see that every day, the Sun is shifting towards the north. This shifting is Ayana. Eventually, the Sun will reach a northward point and look stationary. This apparent ‘stopping’ is called Solstice (Sol = Sun, Stice = stationary). Up to this point is the first Ayan motion, i.e., the Sun’s apparent motion from south to north. This takes six months. From here, the Sun again goes back southward, which is the second Ayana. So in one year, Sun gets these two Ayans.

दक्षिणेहून नभी हलत ।

पुढे उत्तरेस सरकत ।

गतिस रवीच्या म्हणतात ।

उत्तरायण ।। ५० ।।

One of the Sun’s two Ayana motions is called ‘उत्तरायण’ (UttarayaNa), i.e. the ‘Northward Ayan’. The Sunrise point appears to shift from south to north in this motion. India is in the northern hemisphere, so we will mainly focus on that hemisphere. The southern hemisphere sees the opposite motion.

The beginning of the ‘Uttarayana’ / Northward Ayan is the Winter solstice. It means the sunrise occurs at the southest point. The northern hemisphere is tilted away from the Sun. It happens around the 21st or 22nd of December, and the days are shorter than the nights. The southward motion stops here for a while, hence the name ‘Solstice’ (the Sun is stationary). From this point, the Sun’s rising position starts shifting northward. The Uttarayana begins. After around three months, it is the midpoint of the Uttarayan. Around 20th March, the Sun appears rising ‘due east’, i.e. precisely at the equator / perfectly to the east. The days and nights are of equal length. Then the Sun continues to shift northward till around 20 / 21st of June. Now, it doesn’t shift northward any further. Up to here is the Uttarayan / northward Ayana.

तिथून पुन्हा मागे फिरून ।

होतो दक्षिणेस गतिमान ।

जाणा यासच दक्षिणायन ।

सूर्याचे असे ।। ५१ ।।

On the 20th or 21st of June, Sunrise appears at the northmost. This point is the ‘Summer Solstice’; the northward motion has stopped, and the days are longer than the nights. The northern hemisphere is tilted closer towards the Sun. This is the beginning of the southward Ayana called the ‘दक्षिणायन’ (Dakshinayana). Now, the Sun appears to be shifting south if observed daily. In the middle of the Dakshinayana, i.e. around 22/23 September, the days and nights are again equal. The Dakshinayaya continues till 21 / 22 December, when the Sun eventually reaches the ‘Winter Solstice’. This six-month motion towards the south is the Dakshinayana.

उत्तर आणि दक्षिणायन ।

एकेक अशी ही आवर्तनं ।

करतो प्रत्येक वर्षातून ।

सूर्य आपूला ।। ५२ ।।

In this way, the Sun goes through one northward and one southward Ayana motion in one year. The Uttarayana, the northward motion, is from 21/22 December to 20/21 June, and the Dakshinayana, the southward motion, is from 20/21 June to 21/22 December. This cycle keeps repeating. The English calendar is solar, so the dates often match the yearly Solstice timing. However, after many years, the calendars need to be calibrated again. The Indian timekeeping system from antiquity has been calibrated from time to time. Once we understand their corrections, the ‘true’ timing of the historical event gets revealed. Otherwise, the history seems mythical or poetic.

गतीने सूर्याच्या या वार्षिक ।

असे एका मागूनीया एक ।

फिरते सहा ऋतुंचे चाक ।

गोल सतत ।। ५३ ।।

This Ayana motion is a yearly motion. We observe these two Ayana motions every year. The atmosphere changes continuously due to the Sun’s position relative to Earth, which we call the seasons. Some parts of the earth experience winter, and others experience summer, rain, and so on. The cycle of seasons continues with the Sun, turning and repeating all around the globe. Of course, the local geographical conditions, the effect of the moon, and some other situations also contribute to variations in seasons. In India, we mainly experience summer, rainy and winter seasons. The seasons vary as we move towards the north or south. When we cross the equator, the Ayan motion and, thereby, the seasons are opposite.

वसंत ग्रीष्म वर्षा नंतर ।

शरद हेमंत व शिशिर ।

चक्र हे फिरे धरणीवर ।

ऋतूंचे सहा ।। ५४ ।।

Indian timekeeping methods have six Ritus (seasons), with ‘Vasant’ or spring being the first, as it brings new life everywhere. At this time, the land starts to observe warm weather, having just finished the chilling winter. Currently, the lunar month of ‘Chaitra’ comes during the Vasant season. Chaitra is considered the first month of the year in many parts of India, like Maharashtra. In the Bhagavat Geeta, Bhagavan Sri Krishna tells Arjuna, “मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः” ।।१०.३५ ।।. i.e. “I am the Margashirsha amongst the months and the Vasanta amongst the seasons.” As per most of the current assumptions, the Mahabharat took place in the last 2000 to 3000 years, but during this period, the Margashirsha and Vasant were coming at different times. This could be the reason that almost all the Geeta commentators have avoided establishing any connection between the spring season and the lunar month of Margashirsha.

According to Shri Nilesh Oak’s scientific method, the year of the Mahabharat War is 5561 BCE. Interestingly, the Margashirsha and the Vasanta Ritu coincided during this time. It is highly probable that Margashirsha was the first month of the year. Then, it seems logical and meaningful when Shri Krishna compares himself with Margashirsha – the first month, and Vasanta – the first season. Later, we will see how the 5561 BCE year was calculated.

After Vasant Rutu comes the Grishma (summer), Varsha (Monsoon), Sharada (Autumn), Hemanta (Pre-winter) and Shishir (Winter) seasons in sequence.

करतो सूर्य अर्ध वर्षात ।

पृथ्वीच्या एका अर्धगोलात ।

प्रखरत असा उष्मापात ।

ग्रीष्म कारक ।। ५५ ।।

At the beginning of the Dakshinayana phase, around May and June, the Sun is towards the north. The Earth’s northern hemisphere is tilted towards the Sun, and the days are longer than the nights, causing the summer season.

एकीकडे सूर्य प्रखरत ।

पलिकडे अभावाने शीत ।

गति फिरवे चक्र सतत ।

सहा ऋतूंचे ।। ५६ ।।

When in the northern hemisphere, there is summer; at the same time, in the southern hemisphere, it is winter. There, the days are shorter than the nights, and due to this, the temperature reduces. Like this, both the hemispheres have opposite Ayayna and seasons: Vasanta at one part and Sharad at the other, Grishma at one and Shishir at the other. This cycle of seasons continues turning due to the Earth’s revolutions and tilt.