मांडतो आजची नभस्थिती ।
आरंभी नक्षत्र ग्रह गती ।
वर्ष मास वार आणि तिथी ।
उदाहरणा ।। १७ ।।
प्राचिन भारतीय ग्रंथांमधे आणि विशेषत: इतिहासामधे, रचनाकारांनी एक महत्वाचा विचार नक्किच केलेला दिसतो. “इतिहासातील एखादी घटना पुर्वी नक्की कधी घडली असेल?”, हे अनेक वर्षांचा काळ लोटल्यावरही त्यावेळच्या लोकांना समजायला हवं. आणि त्यासाठी काहीतरी व्यवस्था करुन ठेवायला हवी, हाच तो विचार. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने, ‘अनेक’ वर्षांचा काळ म्हणजे काही शे-पाचशे वर्षांचा काळ नाही. अनेक वर्ष म्हणजे अनेक सहस्र वर्ष. वीस-सहस्र, पन्नास-सहस्र, इत्यादी. सध्याच्या पाश्चिमात्य दृष्टिकोनातून इतक्या सहस्र वर्षांपूर्वी तर मानव मुळी विकसितच नव्हता. भारतीय संस्कृतीत मात्र इतक्या प्राचीन काळीसुद्धा मनुष्य अत्यंत प्रगल्भावस्थेत दिसतो. भारतीय इतिहासात किंवा पुराण ग्रंथात, त्या-त्या वेळेच्या परिस्थितीचं अनेक प्रकारांनी वर्णनं करून, त्या काळाचा जणू दिनांकच मांडलेला दिसतो.
समजा एखादी घटना गुरूवारी घडली असं एखाद्या ग्रंथात लिहिलं आहे. पण इतक्यावरून तो दिवस नक्की कोणत्या महिन्यातला होता, कोणत्या सालचा होता हे समजणार नाही. कारण गुरुवार तर दर आठवड्याला येतो. मग आपल्याला आणखी काही तपशील लागतील. समजा त्यादिवशी चंद्रग्रहण होतं असाही उल्लेख आहे. तर मग आपण मागे झालेली चंद्रग्रहणे तपासून त्यातील कोणत्या दिवशी गुरूवार होता, असं बघत गेलो तर त्यापैकीच एखाद्या दिवशीचं हे वर्णन असणार, हे आपल्या सहज लक्षात येतं. सहाजिकंच, जितक्या जास्त प्रकारे आणि वैशिष्ट्यपुर्ण वर्णनं असेल तितकं चांगलंच.
अशा वर्णनांपैकी, खगोलवर्णन हे काल शोधण्याचं सर्वात उत्तम साधन आहे. प्राचिन इतिहासकारांना हे पक्कं माहित होतं. एखाद्या घटनेचं वर्णन करताना त्या-त्या काळातील ग्रहांच्या स्थानांचही वर्णन महत्वाचं ठरतं. त्यावेळी विविध ग्रहं आकाशात कोणत्या ठिकाणी दिसंत होते, त्यांचं दृष्य स्वरूप कसं होतं, हे इतिहासकारांनी मुद्दाम नोंदवून ठेवलेलं दिसतं. तत्कालिन प्रचलित ‘कॅलेंडर’ प्रमाणे दिनांक इत्यादी न देता, आकाशात भ्रमण करणाऱ्या ग्रह-ताऱ्यांची वर्णनं केलेली आढळतात. कारण काळानुरून ‘कॅलेंडर’ बदलतात, त्यात फेरफार होतात, काही वेळेला ती कालबाह्यही होतात. पण पृथ्वी, ग्रह, तारे यांच्या गती मात्र अब्जावधी वर्षांपासून जवळपास समानंच असतात. त्यांच्या नोंदी कितीतरी जास्त वर्षांनंतर आजही कालमापनास उपयुक्त ठरतात. त्यांच्या स्थितीवरून आजही आपण तो काळ अचूक शोधू शकतो.
आता सिरिजची सुरवात करताना गंमत म्हणुन, आपण सध्याच्या एका दिवसाचं वर्णन खगोलीय परिभाषेत करू. पहिल्यांदा कदाचित हे वर्णन तुम्हाला विचित्र वाटेल. पण यावरून आपण काल कसा शोधू शकतो, हे पुढे तुमच्या लक्षात येइलंच. इतिहासात अशा प्रकारे खगोलीय वर्णन केल्याचं किती महत्व आहे, हे ही या उदाहरणावरून आपल्याला समजेल.
आज ॲागस्ट आठवा दिन ।
गुरूवार आणि वर्ष जाण ।
असे प्रचलित इस सन ।
विसशे २४ ।। १८ ।।
उदाहरण म्हणुन मी एक दिवस गृहित धरला आहे. तो म्हणजे गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४. (Thursday, 8 August 2024 A.D.). तसं कोणत्याही दिवसाचं खगोलिय भाषेत वर्णन केलं जाउ शकेल. पण हा दिवस निवडण्याचं एक साधं कारण आहे. ते म्हणजे ७ ऑगस्टची रात्र संपल्यावर, रात्री १२:३० नंतर म्हणजे ८ ऑगस्टला, मला काव्यामधे ज्योतिषाष्टकं लिहिण्याची प्रेरणा मिळाली. याबद्दल आपण प्रस्तावनेत सविस्तर बोललोच आहोत.
आपण हा जो दिनांक सांगतो, तो इंग्रजी कॅलेंडरनुसार आहे. याला ‘ग्रेगोरियन’ कॅलेंडर म्हणतात. हे इंग्लिश कॅलेंडर आज जवळपास सर्वंत्र वापरलं जातं. आपण त्याला इसवी सन किंवा इ.स. म्हणतो. असं मोजायला लागल्यास कॅलेंडरच्या प्रारंभा पासून आज पर्यंत २०२४ वर्ष झाली असं हे कॅलेंडर सांगतं. खरं तर इ. स. १५२८ साली, आधीच्या ‘ज्युलिअन’ कॅलेंडर मधे सुधारणा करून, हे कॅलेंडर सुरू केलं गेलं. त्या जुन्या कॅलेंडरमधे लीप इयर, व इतर काही निवडक दिवस मोजताना त्रुटी आढळत होत्या. त्यामुळे त्यात काही सुधार केले गेले. हे काम पुर्ण झाल्यावर, इ.स. १५२८ सालपासून हे नवं कॅलेंडर लागू झालं. त्या सालचे प्रमुख पोप ‘ग्रेगोरि XIII’ (१३ वे) यांच्या कार्यकाळात ते झालं. त्यामुळे हे कॅलेंडर ग्रेगोरींच्या नावाने प्रसिद्ध झालं.
ग्रगोरियन हे Tropical कॅलेंडर आहे. म्हणजे त्यात प्रामुख्यानी सूर्य आणि पृथ्वी यांच्या परस्पर स्थानाचा विचार केलेला असतो. मागच्या नक्षत्र व ताऱ्यांच्या पार्श्वभूमीचा विचार केलेला नसतो. या सिरिजमधे पुढे आपण कॅलेंडर, त्यांचे प्रकार आणि भारतीय खगोलिय कालमापनाची असणारी वैज्ञानिकता इत्यादी अनेक विषयांवर बोलूच. आता हा दिवस आपण इतर ग्रह, राशी, नक्षत्रं इत्यादींच्या सापेक्ष बघू.
शुक्लपक्षी श्रावण मासाला ।
आज गुरूवारी चतुर्थीला ।
मध्यरात्रीस मजला दिला ।
आशीर्वाद हा ।। १९ ।।
सूरवातीला आपण चंद्राच्या संदर्भात तपशील बघू. ज्या मध्यरात्री मला प्रेरणारुपी आशीर्वाद मिळाला तो गुरुवार होता. यातली मध्यरात्रं ही पृथ्वीच्या सूर्यासापेक्ष गतीमुळे कळणारी गोष्ट आहे. त्या दिवशी श्रावण महिना सुरू होता आणि ती शुक्लपक्षातली चतुर्थी (चवथी) तिथी होती.
चंद्र नभी कन्या राशी असे ।
उत्तरा नक्षत्रा मधे दिसे ।
विनायकी आणि नाग असे ।
चतुर्थी आज ।। २० ।।
श्रावण, भाद्रपद इ. महिन्यांना चांद्रमास म्हणतात, कारण ते चंद्राच्या गतीवर आधारीत असतात. प्रत्येक चांद्रमासात साधारण १५-१५ दिवसाचे दोन पक्ष येतात. पहिला शुक्लपक्ष व दुसरा कृष्णपक्ष. प्रत्येक पक्षात प्रथमा पासून पोर्णिमा किंवा अमावस्ये पर्यंत अशा १५-१५ तिथी असतात. त्या दिवशी शुक्लपक्षातील चतुर्थी होती. जीला ‘विनायकी चतुर्थी’ म्हणतात. पण श्रावण महिन्यातल्या या चतुर्थीला ‘नाग चतुर्थी’ असंही म्हणतात. दुसऱ्या दिवशी नाग पंचमी.
आता अशी नाग चतुर्थी तर प्रत्येक वर्षी श्रावणात येते. म्हणुन दिवस नक्की करण्यासाठी आणखी काही तपशील बघू. त्यादिवशी चंद्राचं आकाशातलं स्थान बघितलं तर तो कन्या राशीत व उत्तरा नक्षत्रात होता. राशी व नक्षत्रावरून आपल्याला आकाशातील एखाद्या वस्तूचं स्थान कळतं. ज्याप्रमाणे आपण अक्षांश, रेखांश किंवा GPS Location बघतो, त्याप्रमाणेच आकाशातील स्थानं सोप्या भाषेत समजायला राशी व नक्षत्र वापरली जातात. पृथ्वी फिरल्यामुळे आकाशात आपण एका वर्तुळाची कल्पना केली तर त्या ३६० अंशाच्या वर्तुळाचे १२ भाग म्हणजे १२ राशी. प्रत्येकी ३०-३० अंश. आणि आणखी लहान म्हणजे २७ भार केले तर ते म्हणजे नक्षत्रं.
ऋतु चालू पावसाळा होत ।
सूर्य गती दक्षिणायनात ।
दिसे तो आश्लेषा नक्षत्रात ।
कर्क राशीला ।। २१ ।।
आता सूर्याच्या स्थितीबद्दल बघू. सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष स्थानामुळे ऋूतू होतात. ८ ऑगस्ट २०२४ च्या वेळी पावसाळा होता आणि सूर्याचं दक्षिणायन सूरू होतं. म्हणजे तो दक्षिणेकडे सरकत होता. त्याचं आकाशात दिसणारं स्थान कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रात होतं.
असे स्थिती सौर वर्षात ।
१७ नभस्य सूर्य मासात ।
असे सुरू विक्रम संवत ।
२०८१ वे ।। २२ ।।
ज्याप्रमाणे चंद्राच्या गतिवरून चांद्रमास, तिथी असतात त्याप्रमाणे सूर्याचेही वर्ष, मास, दिवस असतात. त्या दिवशीचं सूर्याचं वर्ष २०८१ विक्रम संवत आहे. आणि सूर्याच्या चालू महिन्याचं नाव ‘नभस’ असं आहे. आणि नभस सौरमासातील हा १७ वा दिवस आहे.
शनैश्चर संथ तो कुंभेत ।
बुध व शुक्र सिंह राशीत ।
गुरू असे वृषभ राशीत ।
मंगळा सवे ।। २३ ।।
चंद्र व सूर्या प्रमाणेच आता आपण इतर काही ग्रहांच्या स्थिती पाहू. त्यात प्रमुख्याने शनी, गुरू, मंगळ, बूध व शुक्र हे ग्रहं येतात. त्या दिवशी शनी कुंभ राशीत होता. बुध व शुक्र हे सिंह राशीत तर गुरु व मंगळ हे वृषभ राशीत होते. त्या प्रत्येकाचं नक्षत्रही आपण लिहू शकतो, पण सध्या एवढी माहिती पुरेशी आहे.
आपल्या ग्रहमालेतील सर्वात हळू सरकणारा ग्रह म्हणजे शनी. संस्कृत मधे ‘शनी’ म्हणजे अक्षरश: ‘हळू’. गुरू म्हणजे मोठा (थोर – Thor). शुक्र म्हणजे शुक्रवान, तेजस्वी (Bright, Brilliant). असे अनेक शब्द आपल्या इतिहासात वापरलेले आढळतात. म्हणजे त्याकाळच्या लोकांना शनी ‘हळू’ जातो हे माहीत होतं. गुरू ‘मोठा’ आहे हे ही माहित होतं. सध्याच्या ‘Modern’ पाश्चात्य लोकांना हे सर्व अगदी अलिकडेच म्हणजे साधारण गॅलिलिओच्या दुर्बिणी नंतरच्या काळात समजलं. मग कोण जास्त प्रगत?
राहितसे आशिया खंडात ।
भारतवर्ष हिंद देशात ।
पुण्यनगर पुण्यभूमीत ।
महाराष्ट्री मी ।। २४ ।।
ही सर्व निरिक्षणं पृथ्वीवरील कोणत्या भागातून केलेली आहेत हे सांगणं महत्वाचं. कारण एका देशात दिवस असेल तर पलिकडे त्याच वेळी रात्र असते. म्हणुन माझं त्या दिवशीचं म्हणजे हे निरिक्षण नोंदवतानाचं स्थान देत आहे: पुणे, महाराष्ट्र, भारत, आशिया खंड.
समजा आपल्या उदाहरणात दिलेला हा सर्व तपशील ‘अनेक’ वर्षांनी कोणाला तरी दिसला. आणि समजा त्यावेळी ग्रेगोरियन किंवा विक्रम संवत, ही ‘कॅलेंडर्स’ अस्तित्वात नाहीत. पण त्यावेळी वाचणाऱ्याला किमान खगोलशास्त्र येत असेल तरी हा तपशील त्याला उपयुक्त ठरेल. इतिहासातील अशा वर्णनांवरून काल निश्चिति कशी करतात हे आपण पुढे बघणारंच आहोत. प. वि. वर्तक, निलेश ओक किंवा अशा पद्धतिने आणखीही काही इतिहास संशोधकांनी मांडलेले कालनिर्णय आपण पडताळून बघणार आहोत.
Index
Astronomy 101
Description of the beginning day
मांडतो आजची नभस्थिती ।
आरंभी नक्षत्र ग्रह गती ।
वर्ष मास वार आणि तिथी ।
उदाहरणा ।। १७ ।।
When the Ancient Indian scriptures, particularly the Itihas, were being composed, the writers had a unique perspective on a crucial point: The need to include provisions in the scripture that would allow people, even after many years, to pinpoint the exact time of a particular event. In the Indian context, ‘many’ doesn’t refer to a few hundred years but to thousands of years- twenty thousand, fifty thousand, and so on. In stark contrast to the modern Western view that humans were uncivilised during such ancient times, the Itihas and other Indian scriptures present the human race as significantly more civilised and mature. By including the descriptions of those times in various ways, the authors enable us to know the exact timeline.
Imagine that a scripture describes an event that occurred on a Thursday. Well, Thursdays come every week. So, with only this information, we can not conclude the exact date, month, or year. We will need more information. Let’s Assume that the scripture also tells us that there was a lunar eclipse on that day. Then, we can list all the past lunar eclipses and find out which ones occur on Thursdays. And most probably, one of them is the day we are looking for. The more peculiar the information, the better to decipher the timeline.
Astronomy is one of the best ways to maintain such information, and ancient Indian authors like Valmiki and Vyas knew this thoroughly. It becomes crucial to include observations of planets while describing an event. In the scriptures, the authors have purposefully recorded the positions of planets, constellations, and so on. Instead of using information from prevalent calendars, the authors used astronomical descriptions. Because the calendars do change, sometimes they even become irrelevant. But the motions of Earth, other planets and stars remain relatively unchanged, even after millions of years. So, their reference remains helpful. We can decipher the timeline precisely by decoding their positions and so on.
Let’s start this series with a day as an example. We will describe the day using such astronomical information. You may find it weird initially, but later, you will know how efficient it is to decipher the date from it. You will understand the importance of having astronomy as background knowledge while determining the timing of historical events. We will talk more as we go further in the series.
आज ॲागस्ट आठवा दिन ।
गुरूवार आणि वर्ष जाण ।
असे प्रचलित इस सन ।
विसशे २४ ।। १८ ।।
We can use any day to describe using astronomical information. But I am taking a particular day as an example. It is Thursday, 8th of August, 2024 A.D. The reason is simple. After midnight on the 7th August, i.e., the early hours of the 8th, I had the inspiration to compose in a poetic style. We have already talked about this in the preface.
The above date is described using the Gregorian calendar, which is used widely today. It says that 2024 years have passed since the reckoning of that calendar. In 1528 A.D., a significant change was made, and this new calendar was implemented. The old method was found to have some errors in counting the leap years and some particular days. So, they came up with a new method of counting days, and the new system was implemented during the time of Pope Gregory XIII in 1528, making it known by his name.
Gregorian calender is a Tropical calendar. It mainly considers the Sun’s position relative to the Earth and not to the background stars. Later, we will look at these topics in more detail. Let’s now see the description of our example day using the moon, Sun and other planets.
शुक्लपक्षी श्रावण मासाला ।
आज गुरूवारी चतुर्थीला ।
मध्यरात्रीस मजला दिला ।
आशीर्वाद हा ।। १९ ।।
First, we will see the description using the Moon. It was Thursday midnight when I was blessed with the inspiration. The midnight here refers to Earth’s rotation relative to the Sun. It was the 4th ‘Tithi’ or the fourth lunar day of the ‘Shravan’ lunar month.
चंद्र नभी कन्या राशी असे ।
उत्तरा नक्षत्रा मधे दिसे ।
विनायकी आणि नाग असे ।
चतुर्थी आज ।। २० ।।
‘Shravan’, ‘Bhadrapad’, etc., are lunar months based on the moon’s motion. From the new moon to the full moon and vice versa, every lunar month has two phases (waxing and waning), each lasting around 15 days. It was the fourth Tithi (Chaturthi) of the Waxing phase (Shukla Paksha), called the ‘Vinayaki Chaturthi’. This Chaturthi of the Shravan month is also called the ‘Nag’ Chaturthi. The next day is of ‘Nag Panchami’.
The ‘Nag Chaturthi’, or the fourth Tithi, occurs every Shravan month. So, let’s add more astronomical details. The moon’s position in the sky that day was in the Virgo constellation. Just like using GPS location or latitudes and longitudes, we use the zodiacs and constellations to tell the positions of planets. Zodiacs are 12 parts of the sky, each 30 degrees, as seen from Earth. And constellations are finer 27 parts of the sky.
ऋतु चालू पावसाळा होत ।
सूर्य गती दक्षिणायनात ।
दिसे तो आश्लेषा नक्षत्रात ।
कर्क राशीला ।। २१ ।।
Now, let’s check the Sun’s position. Its north-to-south position with respect to the Earth causes seasons. The Sun was shifting towards the south, and it was rainy season. The Sun was in the Cancer zodiac and in the Hydrae constellation.
असे स्थिती सौर वर्षात ।
१७ नभस्य सूर्य मासात ।
असे सुरू विक्रम संवत ।
२०८१ वे ।। २२ ।।
Just like the moon, we have a solar calendar system. The Indian solar year of that day is Vikram Samvat 2081. It was the 17th day of the solar month named ‘Nabhas’.
शनैश्चर संथ तो कुंभेत ।
बुध व शुक्र सिंह राशीत ।
गुरू असे वृषभ राशीत ।
मंगळा सवे ।। २३ ।।
Now, we will see the zodiac positions of other planets, such as Saturn, Jupiter, Mars, Venus, and Mercury. Saturn was in Aquarius, Mercury and Venus were in Leo, and Jupiter and Mars were in Taurus. We can also write their constellations, but for now, this much is sufficient.
Saturn is the slowest-moving planet in our Solar system. Its Sanskrit name,’ Shani’, literally means ‘the Slow one.’ Jupiter – or ‘Guru’ in Sanskrit means the Big one, also called ‘Thor’ (थोर), i.e. big one. Does it Sound familiar? The name for Venus is ‘Shukra’, which means ‘one who has Shukra’ or ‘One having brilliance’. We can find such names all over the ancient Indian scriptures. It means, in ancient times, people knew about Saturn’s slowness, Jupiter’s biggness, and so on. The so-called ‘modern’ Western people realised this only around Galileo’s telescope. Then, who is more advanced?
राहितसे आशिया खंडात ।
भारतवर्ष हिंद देशात ।
पुण्यनगर पुण्यभूमीत ।
महाराष्ट्री मी ।। २४ ।।
It might be daytime in one place, but on the opposite side, it will be night. Knowing the location from where one has recorded the observations is crucial. So, let me give you my location on that day. It is – Pune, Maharashtra, Bharat, Asia continent.
Imagine somebody from the far future trying to find the exact time based on the information in our example. Also, imagine that at that time, the Gregorian or Vikram Samvat Calendar systems are no longer understood. But if the person knows at least the basics of astronomy, it would be helpful to decipher the timeline. In the same way, we can decipher the timeline from our Itihas references. It is the very purpose behind this series. We will learn how Itihas researchers like P.V.Vartak, Nilesh Oak, and a few others have used astronomy references to determine the dating of historical events.
Index